Gharkul Yojana List 2026: महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नुकतीच नवीन घरकुल यादी जाहीर करण्यात आलेली आहे. स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असतेच. वाढती महागाई आणि आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना स्वतःचे घर बांधणे देखील खूप कठीण जात असते. अशा लोकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) राबविण्यात येते. २०२६ च्या नवीन वर्षात सरकारने या योजनेला गती दिली असून नवीन लाभार्थी यादी जाहीर केलेली आहेत.
या लेखामध्ये आपण घरकुल यादीत नाव कसे चेक करायचे, नवीन यादीत कोणाला संधी मिळेल आणि घरकुल मंजूर झाल्यावर मिळणाऱ्या निधीच्या हप्त्यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहे.
योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये (Key Highlights)
| माहितीचा प्रकार | तपशील |
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी) |
| लाभार्थी वर्ष | २०२५-२०२६ (नवीन अद्ययावत यादी) |
| आर्थिक मदत (अनुदान) | ग्रामीण: ₹१,२०,०००/- (डोंगराळ भाग: ₹१,३०,०००/-) |
| अतिरिक्त लाभ | मनरेगा मजुरी व शौचालय अनुदान वेगळे |
| अधिकृत वेबसाइट | pmayg.nic.in |
घरकुल यादीत नाव कसे तपासायचे? (Step-by-Step)
तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा संगणकावरून खालीलप्रमाणे गावाची यादी तपासू शकतात:
१. वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत पोर्टल (pmayg.nic.in) ला भेट द्यावी.
२. Awaassoft पर्याय: होम पेजवरील मेनू बारमध्ये ‘Awaassoft’ वर क्लिक करा आणि त्यानंतर ‘Report’ हा पर्याय निवडायचा आहे.
३. Beneficiary Details: नवीन पेजवर खाली स्क्रोल करून ‘H. Social Audit Reports’ या सेक्शनमधील ‘Beneficiary Details For Verification’ या लिंकवर क्लिक करायचे आहे.
४. माहिती भरा: सिलेक्शन फिल्टरमध्ये तुमचे राज्य (Maharashtra), जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. वर्ष निवडीमध्ये ‘2025-26’ सिलेक्ट करायचे आहे.
५. योजना निवडा: ‘Pradhan Mantri Awaas Yojana Gramin’ हा पर्याय निवडायचा आहे.
६. कॅप्चा कोड: विचारलेल्या गणिताचे अचूक उत्तर टाकून ‘Submit’ बटनावर क्लिक करा. तुमच्या गावाची पीडीएफ यादी समोर येईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव आणि घराचे ‘Sanctioned’ स्टेटस पाहू शकतात.
घरकुल योजनेची रक्कम आणि हप्ते (Installment Details)
घरकुलाचा निधी थेट बँक खात्यात चार टप्प्यांमध्ये जमा केला जातो. त्यासाठी घराच्या बांधकामाचे फोटो अधिकृत ॲपवर अपलोड करणे आवश्यक असते:
- पहिला हप्ता (₹१५,०००): घर मंजूर झाल्यावर (पाया खोदण्यापूर्वी).
- दुसरा हप्ता (₹४५,०००): जोते (Plinth Level) पूर्ण झाल्यावर.
- तिसरा हप्ता (₹४०,०००): लिंटल लेव्हल (दारे-खिडक्यांच्या वरची पातळी) झाल्यावर.
- चौथा हप्ता (₹२०,०००): घर पूर्ण होऊन प्लास्टर झाल्यावर.
महत्त्वाचे प्रश्न (FAQs)
१. स्वतःची जागा नसेल तर घरकुल मिळेल का?
होय, ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही अशा भूमिहीन लाभार्थ्यांसाठी सरकारने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजना’ सुरू केली आहे. यामध्ये जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जात आहे.
२. घरकुलासाठी पैसे मागत असल्यास तक्रार कुठे करावीत?
घरकुल योजना पूर्णपणे मोफत आणि पारदर्शक आहे. जर कोणी पैसे मागत असेल, तर तुम्ही १८००-११-६४४६ या टोल-फ्री नंबरवर किंवा जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO, ZP) यांच्याकडे तक्रार करू शकतात.
निष्कर्ष: प्रधानमंत्री आवास योजना ही केवळ सरकारी योजना नसून ती गरीबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे साधन आहे. जर तुमचे नाव अद्याप यादीत नसेल, तर ग्रामपंचायतीमधील ‘Permanent Wait List (PWL)’ तपासा किंवा पुढील ‘Awaas Plus’ सर्वेक्षणाची वाट पहावी.