Ladaki Bahin Yojana March Installment Date: राज्यातील लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी नुकतीच समोर येत आहेत. ‘लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक लाभाची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणीसाठी पुढील हप्त्याबाबत मोठी चर्चा सुरू आहेत. अनेक महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने चिंतेचे वातावरण पसरलेले पाहायला मिळाले होते, मात्र आता दोन महिन्यांचे पैसे एकत्र तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फेब्रुवारीचा हप्ता का रखडला आहे?
लाडकी बहिणी योजनेच्या नियमानुसार दर महिन्याला पंधराशे रुपये ठराविक वेळेत हप्ता जमा होतो, मात्र मार्च महिना अर्धा संपत आला तरी फेब्रुवारीचे १५०० रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणारा वेळ किंवा तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब झाला असावा अशी माहिती देण्यात आलेली आहे. परंतु, हा विलंब आता लाभार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतोय.
खात्यात ३००० रुपये जमा होण्याची माहिती
फेब्रुवारीचा हप्ता प्रलंबित असल्याने आणि आता मार्च महिना सुरू असल्याने, सरकार दोन्ही महिन्यांचे हप्ते (फेब्रुवारी + मार्च) एकत्र जमा करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच प्रसार माध्यमांमध्ये पसरलेले आहे. जर असा निर्णय झाला, तर महिलांच्या खात्यात थेट ३००० रुपये जमा खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. प्रशासकीय पातळीवर या पर्यायावर विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहेत. यामुळे महिलांना एकाच वेळी दुप्पट आर्थिक आधार मिळणार आहे.
e-KYC अनिवार्य: ३१ मार्च ही शेवटची संधी पुढे आली आहे
योजनेचा लाभ विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर) पूर्ण करणे बंधनकारक आहेत.
- मुदत: e-KYC दुरुस्त करण्याची किंवा पूर्ण करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ पुढे वाढवण्यात आलेले आहे.
- परिणाम: ज्या महिलांचे e-KYC पूर्ण नसेल किंवा माहिती चुकीची असेल, त्यांचे पैसे खात्यात जमा होणार नाही.
- काय करावे: जवळच्या सीएससी (CSC) केंद्रात किंवा संबंधित बँकेत जाऊन आपले केवायसी तपासा आणि आवश्यक असल्यास अपडेट करायचा आहे.
हप्ता मिळण्यासाठी या ५ गोष्टी चेक करा
अनेकदा लहान चुकांमुळे हप्ता थांबतो. लाभ मिळवण्यासाठी खालील बाबींची खात्री करा: १. आधार लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करावी. २. DBT सक्रिय: बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सुविधा सुरू असावीत. ३. अचूक माहिती: अर्जात दिलेला खाते क्रमांक आणि IFSC कोड बरोबर असल्याची खात्री करावी. ४. KYC स्टेटस: तुमचे e-KYC पूर्ण आणि अचूक असावेत. ५. मोबाईल लिंक: बँक खाते आणि आधारला तुमचा चालू मोबाईल नंबर लिंक ठेवा.
निष्कर्ष: लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला थोडा उशीर झाला असेल तरी, दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळाल्यास तो महिलांसाठी मोठा आर्थिक आधार करणार आहे. तोपर्यंत महिलांनी आपली कागदपत्रे आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण करून ठेवणे हिताचे आहेत.